Ad will apear here
Next
‘अखंड घुंगरू नाद’मधून रोहिणी भाटे यांना आदरांजली
देशभरातील कलाकारांचा समावेश
रोहिणी भाटेपुणे : कथ्थक नृत्यासाठी आयुष्य वेचण्याबरोबरच त्या परंपरेचा धागा जपत या नृत्यप्रकारात सर्जनशील प्रयोग करणाऱ्या गुरू रोहिणी भाटे यांना त्यांच्या ९४व्या जयंतीनिमित्त आदरांजली अर्पण करण्यासाठी १४ व १५ नोव्हेंबर २०१८ रोजी ‘अखंड घुंगरू नाद’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

नादरूप कथ्थक संस्था, महाराष्ट्र कल्चर सेंटर आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्र यांच्या वतीने हा आयोजित हा कार्यक्रम सर्वांसाठी खुले आणि विनामूल्य असणार आहे. गुरू रोहिणी भाटे यांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये कल्पनाशक्ती, सृजनशीलता व नृत्यनिष्ठा यांचा त्रिवेणी संगम होता. त्यांनी कथ्थककलेला खऱ्याअर्थाने भाषासौंदर्याची जोड दिली आणि कथ्थक नृत्यशैली सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवीत त्याला लोकमान्यता मिळवून दिली, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

धीरेंद्र तिवारीभाटे यांनी केलेल्या कार्याला आदरांजली देण्यासाठी ‘अखंड घुंगरू नाद’चे आयोजन करण्यात आले आहे. यात १४ नोव्हेंबरला टिळक रस्त्यावर असलेल्या नादरूप संस्थेच्या कार्यालयात सलग बारा तास घुंगरू नाद करण्यात येईल. त्या दिवशी सकाळी नऊ ते रात्री नऊवाजेपर्यंत कथ्थक गुरू शमा भाटे, मनिषा साठे, भरतनाट्यम् नृत्यांगणा सुचेता भिडे-चापेकर व नादरूप संस्थेतील नृत्यांगना घुंगरू नाद करीत भाटे यांना आदरांजली वाहतील.     

रागिणी महाराज१५ नोव्हेंबरला हिराबाग चौकातील ज्योत्स्ना भोळे सभागृह येथे सकाळी नऊ वाजल्यापासून सायंकाळी ७.३० दरम्यान कथ्थक नृत्याच्या माध्यमातून देशभरातील कथ्थकनर्तक व नृत्यांगना आपली नृत्यकला सादर करतील. या वेळी पंडित बिरजू महाराज यांची नात आणि कथ्थक नृत्यांगना रागिणी महाराज, जयपूरच्या मनीषा गुलयानी, बंगळूरूच्या कथ्थक नृत्यांगना व नृत्यदिग्दर्शिका मधू नटराज आणि नंदिनी मेहता, जयपूर घराण्याच्या कथ्थक नृत्यांगना विधा लाल, पश्चिम बंगालचे नर्तक अशीमबंधू भट्टाचार्य, सौविक चक्रवर्ती, रायगड घराण्याच्या परंपरेतील अल्पना वाजपेयी यांबरोबरच जयपूर घरा गौरी दिवाकर, स्वाती सिन्हा, धीरेंद्र तिवारी आणि मधु नटराज हेही आपली नृत्यकला सादर करणार आहेत.

कार्यक्रमाविषयी :
दिवस : बुधवार, १४ नोव्हेंबर २०१८
वेळ : सकाळी नऊ ते रात्री नऊ
स्थळ : नादरूप कथ्थक संस्थेचे कार्यालय, टिळक रस्ता, पुणे.
दिवस : गुरुवार, १५ नोव्हेंबर २०१८
वेळ : सकाळी नऊ ते सायंकाळी ७.३०
स्थळ : ज्योत्स्ना भोळे सभागृह, हिराबाग चौक, पुणे.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/HZVGBU
Similar Posts
‘नादरूप’च्या वर्धापन दिनानिमित्त विशेष कार्यक्रम पुणे : ‘प्रसिद्ध कथक नृत्यांगना शमा भाटे यांच्या ‘नादरूप’ या कथक संस्थेच्या ३१व्या वर्धापन दिनानिमित्त येत्या शनिवारी, दि. एक सप्टेंबर रोजी पद्मावती येथील अण्णाभाऊ साठे सभागृहात सायंकाळी सहा वाजता ‘इकोज ऑफ दी इनर व्हॉईस’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला असून,
‘परिक्रमा’ नृत्य महोत्सव ६ ते ९ डिसेंबरदरम्यान पुणे : ‘आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केलेल्या कलाकारांचा कलाविष्कार आणि नृत्यसादरीकरण अनुभवण्याची संधी देणाऱ्या ‘परिक्रमा’ या नृत्य महोत्सवाचे आयोजन गुरुवार, सहा डिसेंबर ते रविवार, नऊ डिसेंबर २०१८ दरम्यान करण्यात येणार आहे. रेणुका स्वरूप प्रशालेच्या पटांगणावर हा चार दिवसीय महोत्सव
शमा भाटेंच्या मुलाखतीतून उलगडला नृत्य संरचनांचा प्रवास पुणे : भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाउंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत ज्येष्ठ नृत्यगुरू शमा भाटे यांची ‘कथ्थकमधील नृत्य संरचनांचा प्रवास’ (कोरिओग्राफी- काल, आज, उद्या) या विषयावर आयोजित केलेल्या प्रकट मुलाखतीला चांगला प्रतिसाद मिळाला.
कथ्थक नृत्यातून उलगडले चित्रपटसृष्टीचे प्रतिबिंब पुणे : चित्रपटांतील गाणी, कविता शास्त्रीय नृत्यातून मांडत प्रसिद्ध नृत्यांगना शर्वरी जमेनीस यांनी कथ्थक नृत्यातून चित्रपटसृष्टीचे प्रतिबिंब उलगडले. गणेश वंदना, कृष्णलीला, दुर्गेचे रूप यांच्या बहारदार सादरीकरणाने शर्वरी आणि त्यांच्या सहकार्‍यांनी ‘वन्स मोअर’ आणि टाळ्यांचा कडकडाटात दाद मिळवली.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language